निपाणे, ता.एरंडोल (वार्ताहर) :जग विज्ञान युगात वावरत असले तरी समाजाने पुर्व जात लावलेल्या रुढ्या परंपरा. आजही ग्रामिण सह शहरी भागात सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे.
दि,२० जुलै रोजी सकाळी दिप पुजा अमावस्या निमित्ताने प्रत्येक माता भगिनींनी आपल्या घरातील दिप सह देव्हारा सुपडे डालके गाळण्या आदले शेर पावशेर टोपल्या झाडू तसेच विविध वस्तू धुवून स्वच्छ साफ सफाई केली जाते त्यानंतर हळद कुंकू लावून पुजा केली जाते. हि दिप पुजा अमावस्ये पासून सणा सुदांना प्रारंभ होतो दिवती आणि सण जाई बेवती असे अहिराणी भाषेत माता भगिनी बोलताना दिसतात म्हणजे येथून पुढे श्रावण महिना सुरू होतो. या धार्मिक महिन्यात महिला वर्ग व्रत वैकल्ये करतात अश्या या दिप पुजा अमावस्येला खूप अन्यंनसाधारण महत्त्व मानले असल्याचे सांगितले जाते.



