दिग्विजय सिंह म्हणताय पुलवामा दहशतवादी हल्ल्याला ‘दुर्घटना’

0

नवी दिल्ली :- पुलवामातील दहशतवादी हल्ल्याला दुर्घटना म्हणणाऱ्या काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या एका टि्वटमुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालकोट येथे केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये नेमके किती दहशतवादी ठार झाले त्याची आकडेवारी मागणारे काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याला ‘दुर्घटना’ म्हटले आहे.

26 फेब्रुवारीला भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानांत घुसून दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक केला. या स्ट्राइकमध्ये किती दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, याची आकडेवारी हवाई दल आणि सरकारने दिलेली नाही. मात्र भाजपा नेत्यांनी मृत दहशतवाद्यांचे वेगवेगळे आकडे सांगितले आहेत. यावरुनही दिग्विजय सिंह यांनी मोदींनी लक्ष्य केले. ‘पंतप्रधान मोदीजी, तुमच्या सरकारमधले काही मंत्री म्हणतात 300 दहशतवादी मारले. भाजपा अध्यक्ष 250 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचे सांगतात. तर योगी आदित्यनाथ 400 दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याचा दावा करतात. मात्र तुम्ही याबद्दल मौन बाळगले आहे,’ असा टोला दिग्विजय यांनी लगावला.

Leave A Reply

Your email address will not be published.