अमळनेर च्या सर्वच्या सर्व दारू दकानांवर एक्साईज अधिकारी पोहचले
जळगाव -प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरातील सर्वच्या सर्व दारूच्या दुकानांवर एक्साईज अधिकाऱ्यांनी तपासणी मोहीम सुरू केली आहे.
लॉकडाऊनच्या काळात जळगाव जिल्ह्यातील सर्व देशी /विदेशी मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी निर्गमित केले होते. असे असूनही लॉकडाऊन कालावधीमध्ये विदेशी मद्य, बीअर व वाईनची विक्री झाल्याचे आमदार अनिल पाटील यांनी निदर्शनास आणून दिले होते. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक यांनी अमळनेर शहरात तपासणी मोहीम हाती घेतली असल्याचे त्यांनी लोकशाहीशी बोलतांना सांगितले
लॉक डाऊन च्या पहिल्या दिवशी असलेल्या दारू स्टॉक आणि आजच्या दारू स्टॉक मध्ये जर तफावत असल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असेही धार्मिक साहेबांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र दारुबंदी कायदा, १९४९ चे कलम ५६ (१) (ब) अन्वये प्राप्त अधिकारानुसार तफावत असलेल्या सर्व दुकानांचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला जाऊ शकतो.
लॉकडाऊनच्या काळात अनुज्ञप्तीधारक राजकुमार शितलदास नोतवाणी व भागीदार अनिता शिरिष चौधरी यांनी लॉकडाऊन काळात दिनांक २१ व ३१ मार्च भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५, अन्वये नियमांचा भंग केला. असल्यामुळे यापूर्वी च कारवाई करण्यात आली आहे
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असतांना अशाप्रकारे आदेशाचे उल्लंघन करणार्या दारू विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई केलीच जाईल असेही त्यांनी निक्षून सांगितले
या कारवाई मुळे जिल्ह्यात खळबळ माजली असून जिल्हयातील ही मोठी साखळी असल्याचेही बोलले जात आहे.
जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात पाहिल्यांदा एव्हढ्या मोठया प्रमाणात कारवाई होत असल्याने प्रशासनाचे अभिनंदन आणि कौतुक होत आहे