Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!
    • एक दिवसाच्या उपचारासाठी उकळले ३ लाखांचे बील
    • शिवराज मोटेगांवकरांना सीबीआयकडून अटक
    • व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
    • पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!
    • रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात
    • नीट पेपरफुटी प्रकरणामागे सर्व भाजपचेच नेते
    • नीट पेपर फुटी प्रकरणात पेपर सेटर्सनीच केला घात!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»दारूचा कारखाना उध्वस्त; २ लाख ६० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त
    गुन्हे वार्ता

    दारूचा कारखाना उध्वस्त; २ लाख ६० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त

    Tushar BhambareBy Tushar BhambareAugust 6, 2021No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाने तालुक्यातील  वावडदा शिवारात बनावट दारूचा कारखाना उध्वस्त  करत सुमारे २ लाख ६० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    वावडदा शिवारातील म्हाळसाई क्रशींग कंपनीजवळ बनावट दारूचा कारखाना सुरू आल्याची गोपनिय माहिती जळगाव राज्य उत्पादक शुल्क विभागाचे पोलीस अधिक्षक सिमा झावरे यांना मिळाली. त्यानुसार त्यांचे पथक गेल्या आठवड्यापासून वावडदा शिवार पिंजून काढला होतो. दरम्यान काल गुरूवारी ५ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० ते १२.३० वाजेच्या दरम्यान म्हाळसाई क्रशींग कंपनीजवळ एका घरावर त्यांनी छापा टाकला असता त्याठिकाणी बनावट कारखाना सुरू असल्याचे दिसून आले. यासंदर्भात येथील वाचमन व त्याची पत्नी राहत असल्याचे प्राथमिक माहिती समोर आली.

    संपुर्ण तीन ते चार खोल्यांची तपासणी केली असता त्याठिकाण बनावट दारू तयार करण्यासाठी कच्चे साहित्य, काचेच्या बाटल्या, बुच, पाण्याच्या बाटल्या, पाण्याचे जार, कॅन्स, बनावट दारूच्या सीलबंद बाटल्या असा मुद्देमाल आढळून आला. यात १ लाख ३१ हजार ४६० रूपये किंमतीच्या बनावट देशी टँगो (१८०एमएल)च्या २ हजार १९१ बाटल्या, ७५ हजार ३०० रूपये किंमतीच्या मॅक्डॉल नं१  (१८०एमएल)च्या ५०२ सीलबंद बाटल्या, ३ हजार ५०० रूपये किंमतीच्या दोन ३५ लिटर ड्रम (मद्यार्क भरलेला), १४ हजार किंमतीचे बॉटलिंग मशिन, १६ हजार रूपये किंमतीचे बुच, ७०० किमतीच्या रिकाम्या बाटल्या, मद्यार्कचे दोन ड्रम, उपकरण, इतर तयार करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू असा एकुण २ लाख ६० हजार १० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

    या गुन्ह्यात संशयित आरोपी वाचमन संजय रमन देवरे (वय ५०,  रा. वावडदा ता.जि.जळगाव) याला पोलीसांनी अटक केली आहे. यासह राहूल चौधरी आणि गौतम माळी (पुर्ण नाव माहित नाही) हे फरार आहे. तिघांवर दारूबंदी कायद्या अधिनियम कलम (६५ ब, ड, ई, एफ, ८३, ८६, ९०, ९८) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    नाशिक विभागीय आयुक्त अर्जून ओहोळ, पोलीस अधिक्षक सिमा झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे मुख्य निरीक्षक सी.एच.पाटील, दुय्यम निरीक्षक सत्यविजय ठेंगडे, दुय्यम निरीक्षक विकास पाटील, आनंद पाटील, अजय गावंडे, योगेश राठोड, नितीन पाटील, मुकेश पाटील, कुणाल सोनवणे यांनी ही कारवाई केली.

    crime news latest news
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!

    May 18, 2026

    शिवराज मोटेगांवकरांना सीबीआयकडून अटक

    May 18, 2026

    पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!

    May 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif