जळगाव | प्रतिनिधी
दाणा बाजारातील गुरुदत्त सेवा मंडळातर्फे पोलन पेठेतील मंदिरात दत्तजयंतीचा उत्सव साजरा करण्यात आला. दुपारी १२ वाजता गुरूदत्ताची महाआरती दि जळगाव पीपल्स बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील व श्री गुरुदत्त सेवा मंडळाचे मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय चौधरी यांच्या हस्ते करण्यात आली. यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी नामदेव चौधरी, जितेंद्र पानसर, अशोक पाटील, मधुकर बारी, राधेश्याम उपाध्ये, प्रकाश चौधरी, अनिल पाटील, सीताराम देवरे, प्रभाकर महाले, मयूर चौधरी, भगवान मराठे, शिवा दळवी, आदिनाथ काकडे, हिरासिंग परदेशी, भागवत निकम, मोहन शिंदे, भगवान मराठे, नाना टेलर, दशरथ चौधरी, बबन हरसूळ, लोकेश चौधरी, चंद्रकांत सावंत, ज्ञानेश्वर पाटील, सुभाष भोळे आदी उपस्थित होते. पिंप्राळ्यातील श्री दत्तात्रेय प्रभू मंदिरात दरवर्षी श्री दत्तात्रेय प्रभू जन्मोत्सवानिमित्त होणारे विविध कार्यक्रम रद्द करून मंदिरात होणारी नित्य पूजाअर्चा करण्यात आली. पिंप्राळा येथील एकमुखी दत्त मंदिर, प्रतापनगर स्वामी समर्थ केंद्रात नाम जप करण्यात अाला.