दाखल्यांसाठी वेळेपूर्वीच अर्ज सादर करावे – डॉ.चिंचकर

0

भुसावळ:- उपविभागातील सर्व नागरिकांनी जात प्रमाणपत्र नॉन क्रिमिलेयर आदि प्रमाणपत्रांसाठी आयत्यावेळी अर्ज न करता वेळेपूर्वीच अर्ज सादर करावे. जेणेकरून दाखल्या अभावी कुणाचेही शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ.श्रीकुमार चिंचकर यांनी केले आहे.

महाऑनलाईनची साईट बर्‍याचदा बंद तर कधी मंद गतीने चालते.तरी तांत्रिक अडचण लक्षात घेता आपल्या पाल्याच्या शैक्षणिक कारकिर्दीबाबत गांभीर्य  घेत अर्ज वेळेवर  अर्ज न करता आधीच अर्ज करून प्रशासनास सहकार्य करावे.शासकीय शुल्‍का व्यतिरिक्त कुणीही अधिक पैशांची मागणी करीत असेल तर भुसावळ उपविभागीय अधिकारी कार्यालयात संपर्क साधून तक्रार अर्ज द्यावा असेही डॉ.चिंचकर यांनी कळविले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.