यावल :- तालुक्यातील प्रती पंढरपूर ख्याती असलेल्या दहीगाव येथील सार्वजनिक श्री विठ्ठल रुक्माई मंदिर यात्रोत्सवनिमित्त 12 नवविवाहित जोडप्यांनी आज सकाळी पूजाअर्चा केली. पूजा रस्त्याचे काम येथील प्रवीण कुलकर्णी व श्री हरिहर गोसावी यांचे मार्फत करण्यात आले. यानिमित्त दहा क्विंटल साबुदाणा फराळ दोन क्विंटल केळी व चहा कॉफी वाटप करण्यात आली.

येथील चहा-कॉफी नथू कोळी यांचे मार्फत वाटप करण्यात आले. साबुदाणा फराळ जरक्तपेढी मार्फत रक्तदान शिबिर आणि महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरासाठी चोपडा येथील डॉक्टर चंद्रकांत बारेला यांची प्रमुख उपस्थिती होती. गावातील डॉक्टरांनी त्यांना सहकार्य केले या कामी मयुर पाटील अरुण पाटील कोमल पाटील प्रकाश कोळी आदींनी परिश्रम घेतले. गावात मंदिर परिसरात तालुक्यासह जिल्ह्यातील भाविकांनी गर्दी केली होती तसेच परिसरातील शाळा साखळी शिरसाळ येथील भक्तगणांनी दिंडी सोहळा आणून विठ्ठल रुक्माई नामाच्या गजरात सारागाव दुमदुमून टाकला सायंकाळी दिंडी सोहळा काढण्यात आला. अध्यक्ष सुरेश देवराम पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गावातील हरिभक्त परायण मंडळींनी तसेच तरुणांनी परिश्रम घेतले.

