दहा दिवसांपासून फरार आरोपीस पोलिसांनी घेतले ताब्यात

0
भुसावळ (प्रतिनिधी)  गेल्या दहा दिवसापासून एका गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला त्यांच्या राहत्या घरातून बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, आकाश गणेश पाटील वय-22 रा.शिरपुर कन्हाळा रोड नारायण नगर भुसावळ याच्या विरुध्द भु.बा.पेठ.पो.स्टे.ला भाग 5 गु.र.न. 546/ 2019 भा.द.वि.क.363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.  तेव्हापासून म्हणजे 10 दिवसांपासून तो फरार होता.  काल दि. 25.11.2019 रोजी  भुसावळ शहरात त्याच्या राहत्या घरी शिरपुर कन्हाळा रोड नारायण नगर  येथे तो आला असल्याची गुप्त माहीती मिळाल्याने पोलीस अधिक्षक  पंजाबराव उगले जळगाव, अप्पर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके जळगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी  गजानन राठोड भुसावळ तसेच बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.वाल्मीक सोनवणे पो.कॉ.कृष्णा देशमुख, उमाकांत पाटील ,प्रशांत परदेशी,तुषार पाटील यांनी लागलीच जावुन त्यास ताब्यात घेतले.  तसेच या गुन्हयात वापरण्यात आलेली मोटरसायकल क्रमांक  एम. एच. 19 डीजे 0742 (बजाज कं.ची पल्सर)  हीही जप्त करण्यात आलीे.  सदर गुन्हयाचा तपास पो.हे.कॉ.वाल्मीक सोनवणे करीत आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.