दहावी-बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर !

0

मुंबई – दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक  जाहीर करण्यात आले आहे. बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारीला तर दहावीची परीक्षा 3 मार्चपासून सुरू होणार आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे.

दरम्यान, जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार १८ फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान बारावीच्या परीक्षा पार पडणार आहेत. तर ३ मार्च ते २३ मार्च दरम्यान, दहावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्याच्या हेतूनं आणि अभ्यासाच्या नियोजनाच्या दृष्टीने यावेळी वेळापत्रक आधीच जाहीर करण्यात आल्याचे शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले आहे. तसंच हे संभाव्य वेळापत्रक असून परीक्षेपूर्वी महाविद्यालये आणि शाळांमध्ये पाठवण्यात येणार परीक्षेच वेळापत्रकच अंतिम मानण्यात येणार असल्याचही मंडळाकडून सागंण्यात आले आहे.

प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अन्य विषयांचं वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना कळवण्यात येईल. लेखी परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत काही सुचना, हरकती असल्यास संबंधित विभागीय मंडळांकडे तसंच राज्य मंडळाकडे १५ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात पाठवाव्यात, असं शिक्षण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.