Wednesday, August 17, 2022

दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी

पश्चिम बंगाल सर्कल ऑफ इंडिया पोस्टमध्ये ग्रामीण डाक सेवक पदासाठी बंपर रिक्त जागा जाहीर करण्यात आली आहे. एकूण २३५७ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया २० जुलै २०२१ पासून सुरू झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑगस्ट २०२१ पर्यंत आहे. या पदांवर अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वेबसाइटला भेट देऊन अधिकृत नोटिफिकेशन पाहणं आवश्यक आहे. तसेच, अर्ज दाखल कोणतीही चूक उमदेवारांनी करु नये, अन्यथा अर्ज बाद होऊ शकतो.

 पात्रता : पश्चिम बंगाल सर्कलमधील ग्रामीण डाक सेवक पदावरील भरतीसाठी केवळ दहावीपर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात. उच्च शिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले तरी त्यांचं दहावीचं गुणपत्रक ग्राह्य धरलं जाईल. ग्रामीण डाक सेवक पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना दहावीमध्ये गणित, स्थानिक भाषा आणि इंग्रजी विषयाचा चा अभ्यास केलेला असणे अनिवार्य आहे. उमेदवारांनी दहावी सोबत संगणकाचं प्रमाणपत्र मिळवलेलं असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा : २० जुलै २०२१ रोजीचं उमेदवारांचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त व 40 वर्षांपेक्षा कमी असावे. अनुसूचित जाती / जमाती, ओबीसी, पीडब्ल्यूडी, पीडब्ल्यूडी ओबीसी आणि पीडब्ल्यूडी एससी / एसटी प्रवर्गाच्या उमेदवारांना अनुक्रमे 5,3,10,13,15 वर्षांची सूट असेल.

परीक्षा फी : १०० रुपये

अर्ज पद्धती : ऑनलाईन

निवड प्रक्रिया : पश्चिम बंगाल सर्कलमधील ग्रामीण डाक सेवक या पदासाठी उमेदवारांची निवड पात्रता परीक्षेच्या आधारावर म्हणजेच दहावीच्या गुणांसाठी केली जाईल. दहावीच्या गुणांच्या आधारे तयार केलेल्या प्रवर्गनिहाय गुणवत्ता यादीनुसार अंतिम निवड केली जाईल. पश्चिम बंगालमधील जीडीएस पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार 20 जुलै 2021 ते 19 ऑगस्ट 2021 पर्यंत अधिकृत वेबसाइट appost.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज सबमिट केल्यानंतर, प्रिंटआउट काढून ठेवू शकतात.

अधिकृत संकेतस्थळ : indiapost.gov.in

जाहिरात(Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या