जळगाव : यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षेत कमी प्रमाणात विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. मात्र, आता याही विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा पार पडणार आहे. ही फेरपरीक्षा २० नोव्हेंबरपासून सुरू होणार असून २३५९ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहे.
दरवर्षी दहावी व बारावीचा निकाल लागताच महिनाभरात फेरपरीक्षा घेतली जाते. मात्र यंदा कोरोना व लॉकडाऊनमुळे फेरीपरीक्षा तातडीने होऊ शकली नाही. आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने २० नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत फेरीपरीक्षा आयोजित करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात दहावीचे १३ तर बारावीचे ८ परीक्षा केंद्र असणार आहे़ तसेच मराठीच्या पेपरने फेरपरीक्षेला सुरूवात होणार आहे.
या योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, लाभाची रक्कम तलाठी, कृषी सहाय्यक किंवा कोतवाल यांचेमार्फत परत करुन सहकार्य करावे. तसेच ग्राम पातळीवरील तलाठी, कृषी सहाय्यक, कोतवाल यांनी आपल्या गावात बाहेरगावावरुन आलेल्या या योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांशी संपर्क साधावा. असे आवाहन अभिजित राऊत, जिल्हाधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.