जळगाव :- माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नाशिकतर्फे दहावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात होत आहे. १ मार्च ते २२ मार्चपर्यंत जिल्ह्याभरातील १३१ केंद्रावर हि परीक्षा होणार आहे. या परीक्षेत ६२ हजार ४९२ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहे. ला कॉपीमुक्तसाठी ६ भरारी तर २१ बैठे पथक नियुक्त करण्यात आले आहे. दरम्यान जिल्ह्यातील ९ केंद्रावर उपद्रवी केंद्र घोषित करण्यात आलेली आहेत.
घोषित करण्यात आलेली ९ उपद्रवी केंद्र
भुसावळ तालुक्यातील किन्ही येथील सर्वोदय माध्यमिक विद्यालय, चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथील माध्यमिक विद्यालय, भडगाव तालुक्यातील कोळगाव येथील गो.पू.पाटील विद्यालय, धरणगाव तालुक्यातील सोनवद येथील मा.ना.काबरे विद्यालय, धरणगाव येथील सारजाई दामोद कुडे माध्यमिक विद्यालय, पारोळा येथील एन.ई. एस हायस्कूल, सावदा येथील आनंदीबाई गंभीर हायस्कूल, यावल येथील साने गुरुजी माध्यमिक विद्यालय, यावल येथील डॉ. झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल.
