दहशतवादी हल्यात बुलडाण्याचा सुपूत्र शहीद !

0

बुलढाणा : एकीकडे संपूर्ण जग करोना विषाणूशी लढा देत असताना, सीमेपलीकडून होणाऱ्या अतिरेकी कारवाया काही केल्या कमी होत नाहीयेत. जम्मू-काश्मीरच्या सोपोर भागात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात CRPF च्या तीन जवानांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. शनिवारी संध्याकाळी नाकाबंदी सुरु असताना हा धक्कादायक प्रकार घडला आहे.  या हल्यामध्ये बुलडाणा जिल्ह्याचे सुपूत्र शहीद  झाले. चंद्रकांत भगवंतराव भाकरे असे शहीद जवान यांचे नाव असून बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील ते रहिवासी आहेत.  ही दुखद बातमी कळताच संपुर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.  शहीद जवान  भाकरे यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे.

गेल्या आठवड्याभरात भारतीय लष्करावर काश्मीरमध्ये झालेला हा तिसरा हल्ला आहे. याआधी पुलवामा जिल्ह्यात झालेल्या हल्ल्यात CRPF चा एक जवान जखमी झाला होता. शुक्रवारी, चार अतिरेकी काश्मीरमध्ये शिरले होते, त्यातील दोघांना कंठस्नान घालण्यात लष्कराच्या जवानांना यश आलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.