मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
काल दसऱ्याच्या निमित्ताने भारतीयांनी सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी सोन्याच्या दरांमध्ये 600 रुपये प्रति तोळ्याहून अधिकची वाढ झाली होती. दसऱ्याच्या दिवशी सोन्याच्या दरांमध्ये फारसा बदल झालेला नसला तरी, काहीशी वाढ नक्कीच झालेली दिसून आली.
दसऱ्यानंतर आता दिवाळीच्या मुहुर्तावर सोने खरेदीला वेग येणार आहे. त्यामुळे काही दिवस सोन्याच्या दरांमध्ये घसरण होण्याची शक्यता आहे. आज मल्टिकमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या दरांमध्ये मोठी घसरण नोंदवली गेली.
मल्टिकमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचे दर 47 हजार 214 रुपये प्रति तोळा इतके होते. तर चांदीचे दर 63 हजार 240 रुपये प्रति किलोवर ट्रेड करीत आहेत. कालच्या तुलनेत mcx मध्ये सोन्याच्या दरांमध्ये दुपारी 12 वाजेपर्यंत 500 हून अधिक रुपये प्रति तोळ्याची घसरण झाल्याचे दिसून आले आहे. मुंबई 48,080 रुपये, चेन्नई 48,710 रुपये, कोलकाता 49,960 रुपये, दिल्ली 50,560 रुपये असे दर आहेत.
तर जळगाव येथील सराफ व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,आजचे सोन्याचे दर 47,350 रुपये तर चांदीचे दर 65300 रुपये आहेत.