Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»दशहतवाद्यांविरोधात लढताना सोलापूरचे सुनिल काळे यांना वीरमरण
    ताज्या बातम्या

    दशहतवाद्यांविरोधात लढताना सोलापूरचे सुनिल काळे यांना वीरमरण

    By June 23, 2020No Comments20 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सोलापूर : लडाखमध्ये चीनबरोबर तणाव असतानाच इकडे पाकिस्तानकडून रोज आगळीक केली जात आहे. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा इथं दशहतवाद्यांविरोधात लढत असताना महाराष्ट्राच्या सुपूत्राला वीरमरण आले. पुलवामामध्ये झालेल्या चकमकीत सोलापूर जिल्ह्यातील पानगांवचे CRPF जवान  सुनिल काळे यांना वीरमरण प्राप्त झाले.

    दरम्यान, आज सकाळी पुलवामा मध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी डोकं वर काढलं होतं.  भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार मारलं. या चकमकीत आपला एक जवान शहीद झाला.

    दहशतवाद्यांशी लढताना सोलापूर जिल्ह्यातील  पानगावचे रहिवासी सुनील काळे यांना वीरमरण आलं.  सुनिल काळे यांनी आज  पहाटे 4.30 वाजता झालेल्या चकमकीत 2 अतिरेक्यांचा खात्मा केल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांना कंठस्नान घालून सुनिल काळे शहीद झाले.  सुनिल काळे शहीद झाल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. काळे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

    दरम्यान, पुलवामामध्ये ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला तो संपूर्ण परिसर भारतीय सुरक्षा दलाकडून घेरण्यात आला असून अद्यापही शोध मोहीम सुरू आहे. अनेक दहशतवादी अजूनही या भागात लपून बसल्याची माहिती आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

    November 7, 2026

    पारंपरिक चवीला आधुनिक साज देणाऱ्या हटके रेसिपीज

    November 3, 2026

    जळगावमध्ये अवैध धंद्यांचे जाळे फोफावले; जुगार अड्ड्यावर गोळीबाराच्या चर्चेने खळबळ!

    November 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif