दळवेलजवळ अपघात; एक ठार

0

पारोळा :- येथील महामार्ग क्र, ६ वरील गतिरोधकावर पुढे चालणाऱ्या ट्रकने अचानक ब्रेक लावल्याने मागुन येणाऱ्या आयशरने जबर धडक मारली. त्यात मागील आयशसरचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

मुंबईहून आर को ट्रांसपोर्ट चा ट्रक (क्र,एम एच २८ए,बी,७०६५) हा नागपूरकडे जात होता. पुढील ट्रक ने अचानक ब्रेक मारल्याने आयशर चालक सय्यद अब्दुल सुबरात (रा, नागपूर) याचा गाडी वरील ताबा सुटल्याने त्याने पुढील ट्रंक ला जोरदार धडक मारली. त्यात ट्रंक वरील क्लिनर अली मोहम्मद खलील रा, हाजीपुर जि, अमेठी याचा केबिन मध्ये दाबून जावुन जागीच मृत्यू झाला तर चालक किरकोळ जखमी झाला. जखमीवर पारोळा कुटीर येथे उपचार सुरू आहे. दरम्यान, घटनास्थळावरून ट्रंक चालक फरार झाला आहे. याबाबत आयशर चालक याच्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कांस्टेबल काशिनाथ पाटील करीत आहेत,

Leave A Reply

Your email address will not be published.