दर्शना चौधरी यांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार प्रदान

0

भडगाव | प्रतिनिधी

शासनमान्य बोधी एज्युकेशनल फाऊंडेशन व जीवन गौरव सार्वजनिक वाचनालय औरंगाबाद  यांच्या मार्फत जाहीर झालेला मानाचा राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार  शिरुड ता. अमळनेर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील सहशिक्षिका दर्शना नथू चौधरी- बोरसे यांना प्रदान करण्यात आला.
जीवन गौरव मासिकाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त औरंगाबाद येथील तापडिया नाट्यगृह येथे 13 जानेवारीला दिमाखदार सोहळ्यात प्रा.डॉ.वाल्मीक सरवदे (माजी अधिष्ठाता मराठवाडा विद्यापीठ) यांच्या हस्ते व प्रा. सुनील मगरे(औरंगाबाद विद्यापीठ),जालिंदर शेंडगे(आंबेडकरी नेते),अश्विनी लाटकर(उपशिक्षणाधिकारी औरंगाबाद), डॉ . प्रविण चाबुकस्वार, प्रा. निलेश सोनवणे, संपादक रामदास वाघमारे, मीरा वाघमारे,यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
श्रीमती दर्शना चौधरी यांना त्यांच्या   शैक्षणिक व सामाजिक योगदानाबद्यल सदरील पुरस्कार जाहीर झालेला होता. शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शोधून त्यांना शालेय प्रवाहात आणून नियमित मुलांसोबत गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या कार्यात त्यांचे मोठे योगदान आहे . त्या अंचळगाव तांडा ता. भडगाव येथील उपक्रमशील मुख्याध्यापक सुरेंद्र बोरसे यांच्या पत्नी आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होतं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.