मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढ टाळली आहे. सलग पाचव्या दिवशी देशातील इंधन दर स्थिर आहेत. त्याआधी २९ दिवस कंपन्यांनी इंधन दरात कोणातही बदल केला नव्हता.
जागतिक बाजारात कच्च्या तेलातील तेजी कायम आहे. आज सोमवारी सिंगापूरमध्ये कच्च्या तेलाचा भाव ०.०८ डॉलरने कमी झाला आणि तो प्रती बॅरल ५२.१७ डॉलर झाला. ब्रेंट क्रूडचा भाव ०.३३ डॉलरने घसरला आणि तो ५५.६६ डॉलर प्रती बॅरल झाला. चीनमध्ये पुन्हा एकदा करोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे काही शहरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीवर निर्बंध लादण्यात आले आहेत.
दरम्यान, आज मंगळवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९०.८३ रुपये आहे. एक लीटर डिझेलचा भाव ८१.०७ रुपये आहे. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८४.२० रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ७४.३८ रुपये आहे. त्याशिवाय चेन्नईत देखील आज पेट्रोलचा भाव ८६.९६ रुपये असून डिझेल ७९.७२ रुपये आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोलचा भाव ८५.६८ रुपये असून डिझेल ७७.९७ रुपये आहे. बंगळुरात आज एक लीटर पेट्रोलचा भाव ८७.०४ रुपये असून डिझेलचा भाव ७८.८७ रुपये आहे.