फैजपूर प्रतिनिधी : दत्त ठिंबक फैजपूर हे गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी राजा यासाठी अतिशय कमी खर्चात पण उत्पादनात मोठी वाढ, यासाठी सदैव प्रयत्नशील आहे.
कै, जितेंद्र पवार सर, यांनी शैक्षणिक पदवी प्राप्त करून सेवा दिली,पण त्यांना नेहमीच शेतकरी बांधवां प्रती मोठी आपुलकी होती, कारण तेही एक भूमीपुत्र होते,
म्हणून रात्री अपरात्री शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी देणे, तसेच जितकें पाणी भरतीने शेतकरी देतोय, त्यासाठी त्याला खूप वेळ लागतो, वीज तेवढीच लागते, पण कष्ट खुप सहन करावे लागत आहे, यांचं जाणिवेतून कै जितेंद्र पवार सर यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान चा मागोवा घेतला,
आणि आपण शेतकरी व पाणी बचतीसाठी, शंभर टक्के काही करू शकतो, असा चंग स्वतः शी बांधला, आणि अतिशय आव्हानात्मक परिस्थितीत दत्त ठिंबक ची फैजपूर येथे कंपनी स्थापन केली.
आजपर्यंत अतिशय शेतकऱ्यांच्या हितासाठी दत्त ठिंबक फैजपूर निर्विवाद कार्य करीत आहेत, दत्त ठिंबक फैजपूर विषयी परिसरातील शेतकरी विश्वास ठेवून उत्पादन वापर करीत आहेत.
कै जितेंद्र पवार सर यांच्या अकाली निधनाने मुळेच त्याचे सुपुत्र युगंधर जितेंद्र पवार हे सुद्धा वडिलांचा वारसा आणि कार्य अतिशय उत्तम रितीने चालवित आहेत, आणि शेतकरी त्यांचाही केंद्र बिंदू असे
याच कार्याची माहिती, व प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी
श्री. तनय पाटील मूळ रहिवाशी अंधेरी , मुंबई
25 वर्षांपासून Mozambique , East Africa इथे settled असलेले बिझनेसमॅन यांनी नुकतीच भेट दत्त ठिंबक फैजपूर येथे देवून तंत्रज्ञान आणि माहिती जाणून घेतली.यावेळी दत्त ठिंबक फैजपूर चे संचालक युगंधर जितेंद्र पवार,
प्रशांत राऊत, तुषार फालक, केतन बानाईत, ह्या दत्त ठिंबक फैजपूर कर्मचारी यांना श्री तन्मय पाटील यांनी शेतकऱ्यांना ठिंबक संच वापरा विषयी मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केले आहे.