दत्तात्रय तावडे यांना पर्यावरण मित्र पुरस्कार प्रदान

0

पाचोरा (प्रतिनिधी) :   राजनंदिनी बहुउद्देशिय संस्थेतर्फे तालुक्यातील कळमसरा येथील निसर्गप्रेमी आणि गंगा नर्सरीचे संचालक दत्तात्रय तावडे यांना “पर्यावरण मित्र पुरस्कार २०२० – २१” प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे वितरण शेंदुर्णी जिनिंगचे संचालक अशोक चौधरी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी महिला आघाडीच्या प्रदेश सचिव वंदना चौधरी यांच्या हस्ते श्रीराम मंदिरात करण्यात आले.

दत्तात्रय तावडे यांनी पशुपक्ष्यांना वेळोवेळी पाणी मिळावे, म्हणून लोकसहभागातून परिसरातील जंगलांमध्ये विविध ठिकाणी हौद बांधून पाणी उपलब्ध करुन दिले. ते विशेषत: उन्हाळ्यात टंचाईच्या काळात पक्ष्यांची तु्ष्णा भागावी, म्हणून झाडांवर परळ बांधून, पाणवठे निर्माण करुन मुक्या प्राण्यांना पाणी उपलब्ध करुन देत आहेत. या स्तुत्य उपक्रमातून त्यांच्यातील भूतदया, मानवतेचे दर्शन घडतेय. गावातील स्मशान भूमीसह अनेक ठिकाणी ग्रामस्थांच्या सहकारातून व्यापक स्वरुपात वु्क्षारोपण करण्यात आले असून या झाडांचे यशस्वीरित्या संवर्धनही करण्यात येत आहे. तसेच त्यांनी ग्रामीण जीवनातील कु्षीसह विविध क्षेत्रातील लोकोपयोगी व दुर्मीळ वस्तूंचे संग्रहालय साकारले. या ग्रामसंस्कु्तीचे रक्षणकर्ते आणि मानवतेच्या पुजाऱ्याच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या वेळी गौरी उद्योग समूह व महाराष्ट्र खान्देश मराठा कुणबी पाटील वधू – वर सूचक केंद्राचे संचालक सुमित पाटील, उपसरपंच कैलास चौधरी, रवींद्र सावंत, शिवाजी देशमुख, शिवाजी घुले, संस्थेचे उपाध्यक्ष युवराज पाटील, संचालक योगेश वाघ आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.