Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»दगडफेकीत महिलेसह ४ जण जखमी; प्रभारी सरपंचासह ६ जणांवर गुन्हा
    गुन्हे वार्ता

    दगडफेकीत महिलेसह ४ जण जखमी; प्रभारी सरपंचासह ६ जणांवर गुन्हा

    Tushar BhambareBy Tushar BhambareDecember 6, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

    डांभुर्णी ता. पाचोरा येथे घर बांधकामाच्या कारणाहुन दोन गटात दगडफेक झाल्याने यात एका महिलेसह चार जण गंभीर जखमी झाले असून जखमींवर जळगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. याप्रकरणी प्रभारी सरपंचासह सहा जणांवर हाणामारीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमींचे वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर कलमांमध्ये वाढ होऊन ३०७ कलमानुसार गुन्हा दाखल होण्याची माहिती पिंपळगाव हरेश्वर पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.

    सदर घटना दि.०५ डिसेंबर रोजी सकाळी ९:३० वाजेच्या दरम्यान घडली असून घटनेविषयी पिंपळगाव (हरे.) पोलिसात सोमवारी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णा भोये यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राकेश खोंडे हे करीत आहेत.

    डांभुर्णी ता. पाचोरा येथील पदमसिंग रामसिंग परदेशी यांच्या नवीन घराचे बांधकामासाठी रविवारी सकाळी ९:३० च्या दरम्यान चिंचपुरे येथील कारागीर आले होते. दरम्यान येथील प्रभारी सरपंच संतोष नवलसिंग परदेशी, अजय ईश्वर परदेशी, उज्वला संतोष परदेशी, अलका ईश्वर परदेशी, ईश्वर विठ्ठल परदेशी, नवल शामसिंग परदेशी यांनी सदर घराचे बांधकाम हे अतिक्रमण भागात असून ते तुम्ही करू नका असे सांगत असतांना घरमालकाचा २० वर्षाचा शाळकरी मुलगा निलेश पदमसिंग परदेशी हा आम्ही आमच्या जागेतच बांधकाम करीत आहोत तुम्ही कारागिरांना असे का बोलता ? असे सांगण्यासाठी गेला असता संतोष नवलसिंग परदेशी सह इतर पाच जणांनी त्यास शिवीगाळ करून हातातील दगड उजव्या डोळ्यावर मारून फेकल्याने त्याचा डोळ्याला गंभीर मार लागला.

    याशिवाय संशयित आरोपींनी हातात दगड घेऊन अलकाबाई पदमसिंग परदेशी, छोटुराम रामचंद्र परदेशी यांना मारहाण करीत असतांना भांडण सोडविण्यासाठी निलेश परदेशी यांचा चुलत काका जीवन बाबूसिंग परदेशी यांच्याही डोक्यावर दगड मारल्याने डोक्याला सात टाके पडले आहेत. तर छोटुराम परदेशी व अलकाबाई परदेशी यांनाही गंभीर दुखापत झाल्याने त्यांनी जळगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार केले.

    घटनेप्रकरणी दि. ६ रोजी सोमवारी पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस ठाण्यात निलेश पदमसिंग परदेशी यांनी अजय ईश्वर परदेशी, उज्वला संतोष परदेशी, अलका ईश्वर परदेशी, ईश्वर विठ्ठल परदेशी, संतोष नवल परदेशी व नवल शमसिंग परदेशी यांच्या विरुद्ध हाणामारीचा गुन्हा दाखल केला आहे.

     

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #pachora crime news
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ

    October 14, 2026

    पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन

    October 14, 2026

    यावलमध्ये ११ महिलांवर मारहाण करून दागिने हिसकावल्याचा आरोप!

    October 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif