भुसावळ | प्रतिनिधी
भुसावळ येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात दाखल दंगल तसेच हाणामारीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. रोहित दीपक गुप्ता (वय २३)रा.नसरवानजी फाईल, भुसावळ याच्या विरुद्ध भाग ५, गुरनं.४२/२०१९ अन्वये १५ जानेवारी रोजी गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा घडल्यानंतर रोहित गुप्ता हा फरार झाल्याने त्याचा शोध सुरू होता. आरोपी शिवाजी नगर भागात आल्याची गुप्त माहिती मिळाल्याने त्यास पोलििसांनी ताब्यात घेतले.तपास पोलीस उपअधीक्षक गजानन राठोड, पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनखाली पोलिस उपनिरीक्षक मनोज ठाकरे हे करीत आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.