‘त्या’ शाळांची शिक्षण उपसंचालकांकडून चौकशी

0

मुख्याध्यापकांचे घेतले लेखी जबाब

पाचोरा (प्रतिनीधी) :  तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात सन – २०१२ पासुन शिक्षक भर्ती व नविन शाळा उघडण्यास शासनाची परवाणगी नसतांना जळगाव जिल्हा परिषदेत १३ आॅगष्ट २०१५ ते ३१ मे २०१९ या कालावधित माध्यमिक शिक्षणाधिकारी पदावर कार्यरत असलेल्या शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांच्या सह्यांचे स्कॅनिंग करून बनावट सह्या व खोटे आवक जावक क्रमांक देऊन संचमान्यता, शिक्षक भर्ती करणे आणि बोगस पटसंख्या दाखवणे याबाबतचे प्रकरण उघडकिस आल्यानंतर आमदार किशोर पाटील यांनी पञकार परिषदघेउन वृत्तपञाद्वारे सदरचा प्रकार उघडकिस आणला होता. त्या शाळांची शिक्षण उपसंचालक नाशिक यांच्याकडुन तातडिने दि १६ डिसेंबर रोजी चौकशी करण्यात आली असुन चौकशी नंतर शाळांचे विविध दप्तरांच्या झेराॅक्स प्रति , समंधित मुख्याध्यापकांच्या स्वाक्षर्‍या करून सोबत नेल्याचे खाञीलायक वृत्त आहे. यासोबतच संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांचे लेखी जबाबही लिहुन घेतल्याचे बोलले जात आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव जिल्हा परिषदेत आगष्ट २०१५ ते मे २०१९ पर्यंत देविदास महाजन हे माध्यमिक शिक्षण अधिकारी म्हणुन कार्यरत होते.माञ शासनाच्या शिक्षण विभागाकडुन २०१२ पर्यंत कुठल्याही प्रकारची शिक्षक भर्ती अथवा शाळांच्या नविन तुकड्यांना मान्यता देण्यात आलेली नव्हती माञ जळगाव जिल्ह्यातिल  सहा शाळांच्या संचालकांनी देविदास महाजन यांची सही स्कॅनिंग करून त्याचा फायदा घेत सन २०१२ पासुन नवीन तुकड्या  व शिक्षक भर्ती करून बनावट सह्या व खोटे आवक जावक क्रमांक दाखउन बेरोजगारांकडुन लाखों रूपये घेऊन मोठ्या प्रमाणात शिक्षक भर्ती केल्याचे सध्या नाशिक येथिल महानगरपालिकेत शिक्षण विभागात कार्यरत असलेले देविदास महाजन यांच्या निदर्शनास  आल्याने त्यांनी शिक्षण उपसंचालक नाशिक यांच्याकडे  दिनांक ५ नोव्हेंबर २०१९ रोजी समंधित प्रकरणाची चौकशी केली होती. सदरची माहीती पाचोर्‍याचे आमदार किशोर पाटिल यांना मिळाल्याने आमदार पाटिल यांनी महाजन यांनी शिक्षण उपसंचालकांना दिलेल्या तक्रारिची प्रत मिळउन पाचोर्‍यातील एका शाळेत जाऊन तपासणी केली असता बोगस शिक्षक भर्ती व दाखविण्यात आलेली पटसंख्या याचा पञकार परिषद घेऊन स्फोट केला.

दुसर्‍या दिवशी विविध वृत्तपञात बातम्या प्रकाशित झाल्याने संपुर्ण जिल्ह्याच्या शिक्षण क्षेञात खळबळ माजली आणी नाशिक येथील उपसंचालक नितिन बच्छाव यांनी तातडीने श्री. साई समर्थ माध्यमिक विद्यालय बांबरूड महादेवाचे, माध्यमिक विद्यालय हातले(चाळीसगाव), माध्यमिक विद्यालय मुंदखेडे (चाळीसगाव), पी.के. शिंदे विद्यालय, पाचोरा व आदर्श माध्यमिक विद्यालय, पाचोरा येथे भेट देउन शाळेतील सन २००९—१० ते आजपर्यंतचे संचमान्यता, मागील दोन वर्षाचे मस्टर, मागील दोन वर्षाचे आवक— जावक रजिष्टर, वैयक्तिक मान्यता, पगारपञकाची पाहाणी केली यावेळी शिक्षण उपसंचालक नितिन बच्छाव यांचे सोबत नाशिक येथील शिक्षण विभागाचे उपनिरिक्षक श्री. शिंदे, जळगाव, जि.प.माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, जळगाव जि.प.चे वेतन पथक अधिक्षक श्री. बारोट उपस्थित होते. यावेळी विविध शालेय दप्तरांच्या मुख्याध्यापकांकडुन छायांकित केलेल्या प्रती, झालेल्या आरोपा बाबत संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांचे लेखी जबाब घेण्यात आले आहे. या प्रकरणामुळे जळगाव जिल्ह्यासह संपुर्ण राज्यातिल शिक्षण संस्थांमध्ये खळबळ उडाली असुन बोगस विद्यार्थी, बोगस तुकड्या व शिक्षकांवर कारवाहीची टांगती तलवार आहे. संस्थांना सदरची बोगस कागदपञे तयार करून देण्यामागे  पाचोरा व भडगाव तालुक्यातील दोन शिक्षकांचा हात असल्याचे वृत्त असुन यांचा शोध घेऊन त्यांची सखोल चौकशी केली असता जिल्ह्यासह विभागातील व महाराष्टभरातील अजुनही काही गुन्हे उघडकिस येण्याची दाट शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.