‘त्या’ विधानावरून साध्वी प्रज्ञाविरोधात कारवाई?

0

नवी दिल्ली :- भाजपाच्या भोपाळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या वादग्रस्त विधानावरून निवडणूक आयोगाने दाखल घेतली आहे. मध्य प्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून आयोगाने याबाबतचा अहवाल मागवला आहे.

नथुराम गोडसे हा स्वातंत्र्योत्तर भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता, असे विधान मक्कल निधी मय्यम पक्षाचे सर्वेसर्वा आणि अभिनेता कमल हासन यांनी केले आहे. याबाबत साध्वी प्रज्ञाची प्रतिक्रिया मागितली असता, नथुराम गोडसे देशभक्त होते, देशभक्त आहेत आणि देशभक्तच राहणार आहेत. त्यांना हिंदू दहशतवादी म्हणणाऱ्यांनी आधी आपण स्वत: काय आहोत, हे पाहायला हवे. अशा व्यक्तींना जनता निवडणुकीत धडा शिकवेल’, असे ती म्हणाली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रज्ञाने राष्ट्रपिता महात्मा गांधींविषयी अपमानास्पद वक्तव्य केले आहे, ज्यामुळे निवडणुकांदरम्यान अशांतता पसरू शकते, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. साध्वी प्रज्ञाविरोधात कारवाईची देखील शिफारस करण्यात आल्याचे समजते.

Leave A Reply

Your email address will not be published.