‘त्या’ मुद्यावरून एकनाथ खडसेंनी साधला फडणवीसांवर निशाना ; म्हणाले…

0

जळगाव प्रतिनिधी : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर दुटप्पी भूमिका घेणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी निशाणा साधला.

देवेंद्र फडणवीस वारंवार अशा घोषणा करतात. वेगळा विदर्भाच्या मुद्द्यावर त्यांनी आपण लग्न करणार नाही, अशी भीष्मप्रतिज्ञा केली होती. पण त्यांनी लग्न केले. असा प्रकार आपण पुराणात पाहिला आहे. विश्वामित्रने ब्रम्हचर्य भंग करून मेनकेशी लग्न केले होते. तसा हा प्रकार आहे. त्यानंतर फडणवीस यांनी राष्ट्रवादीशी युती करणार नाही, असे सांगितले होते. पण पहाटे शपथ घेतली. आता ते सत्ता दिली तर ओबीसींना आरक्षण मिळवून देऊ म्हणतात, सत्ता नसेल तर मदत करणार नाही, असे वाटते, असं एकनाथ खडसे म्हणाले.

फडणवीस यांनी राजकारणातून संन्यास घेऊ नये, ते विरोधी पक्षनेते म्हणून उत्तम काम करत आहेत, त्यांनी 5 वर्षे सरकारला सूचना कराव्यात, असा सल्ला एकनाथ खडसे यांनी दिला.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची दुटप्पी भूमिका आहे. गेल्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी आरक्षणाचा अध्यादेश काढला होता पण ती फसवणूक होती. जोपर्यंत जनगणनेचा डाटा उपलब्ध होत नाही, तोपर्यंत अध्यादेशाला महत्त्व नाही, हे फडणवीस यांना माहिती होते. अजूनही वेळ गेलेली नाही. केंद्र सरकारकडून डाटा आणला तर राज्य सरकार त्यावर काम करू शकेल. पण केंद्राकडून डाटा मिळू द्यायचा नाही, आणि ओबीसींचे आम्हीच पाठीराखे असे म्हणायचे ही दुटप्पी भूमिका फडणवीस यांची आहे, असा हल्लाबोल एकनाथ खडसे यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.