”त्या” जागेचं नाव सांगावं जिथे मला गोळ्या घालणार आहेत ; असदुद्दीन ओवेसी

0

मुंबई : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार वादग्रस्त होताना दिसत आहे. कारण केंद्रीय राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांनी वादग्रस्त वक्‍तव्य केले आहे. त्यांच्या वक्‍तव्याचे आता पडसाद उमटताना दिसत आहेत. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपा नेते अनुराग ठाकूर यांच्या गोळ्या घाला वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना थेट आव्हान दिले आहे. असदुद्दीन ओवेसी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना अनुराग ठाकूर यांच्यावर टीका करताना आव्हान दिले आहे. मी अनुराग ठाकूर यांना आव्हान देतो की, त्यांनी मला भारतातील त्या जागेचं नाव सांगावं जिथे मला गोळ्या घालणार आहेत. मी तिथे येण्यास तयार आहे. नागपाडा येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे, मी अनुराग ठाकूर यांना आव्हान देतो की, त्यांनी मला भारतातील त्या जागेचं नाव सांगावं जिथे मला गोळ्या घालणार आहेत. मी तिथे येण्यास तयार आहे. तुमच्या वक्तव्याने माझ्या मनात कोणतीही भीती निर्माण होणार नाही. कारण आमच्या माता आणि भगिनी देश वाचवण्यासाठी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्या आहेत.

राजधानी दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी, भाजपा व कॉंग्रेस या तीन पक्षात मुख्य लढत असून, तिन्ही पक्षांनी दिल्लीची सत्ता मिळवण्यासाठी प्रचारात झोकून दिल्याचे चित्र सध्या आहे. भाजपाचे उमेदवार मनीष चौधरी यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत केंद्रीय राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी वादग्रस्त घोषणा दिली होती.

रिठला विधानसभा क्षेत्रात झालेल्या या सभेत भाषण करताना अनुराग ठाकूर यांनी देश के गद्दारों को.. अशी घोषणा केली. त्यानंतर सभेला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी गोली मारो *** को अशी घोषणाबाजी केली होती. यानंतर अनुराग उपस्थितांना मोठ्या आवाजात या घोषणा देण्याचे आवाहन करताना दिसतात. या सभेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही उपस्थिती होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.