त्या गाव गुंडांवर कारवाई करून महाविद्यालयाची पवित्रता राखा!

0

नूतन मराठा कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून निषेध: 29 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर कर्मचाऱ्यांचा मोर्चा

जळगाव:- येथील नूतन मराठा महाविद्यालयात गेल्या वर्षभरात प्राचार्य कर्मचारी सुरक्षारक्षक यांच्यावर प्राणघातक हल्ले करून महाविद्यालयाच्या परिसरात दहशत माजविणाऱ्या देशी दारू दुकानदार तसेच भादवि कलम 307 सारख्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी विजय भास्कर पाटील मनोज भास्कर पाटील पियुष पाटील यांच्यावर जिल्हापेठ पोलिसांनी कारवाई न केल्याने नूतन मराठा महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी आज दि 10 जुलै रोजी सकाळी 11 वाजता महाविद्यालयीन परिसरात कर्मचारी काळ्याफिती लावून त्या गाव गुंडांवर कारवाई करा महाविद्यालयाची पवित्रता राखा अशा घोषणा देत तीव्र निषेध नोंदविला.

याबाबत सविस्तर असे की दिनांक 6 जुलै 2019 रोजी आम्ही सर्व नूतन मराठा महाविद्यालयातील कर्मचारी यांच्या वतीने प्रा.डॉ. एल पी देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन विजय भास्कर पाटील मनोज भास्कर पाटील पियुष पाटील व इतर गावगुंडांच्या दहशतीमुळे होणाऱ्या त्रासातून सुटका मिळावी अशी मागणी केली होती तसेच दिनांक 10 जुलै 2019 पर्यंत या गाव गुंडांवर कारवाई न झाल्यास दिनांक 10 जुलै 2019 ला काम बंदचा इशारा दिला होता.

परिषदेत आम्ही म्हणाल्याप्रमाणे पोलीस प्रशासनावर कुठलातरी दबाव असल्याकारणाने मागील अनुभवाप्रमाणे त्यांनी कुठलीच कारवाई केली नाही व या गाव गुंडांवर कारवाई करण्याचे आश्वासन सुद्धा दिले नाही त्यामुळे आज दिनांक 10 जुलै 2019 रोजी आम्ही सर्व नूतन मराठा कर्मचारी यांनी एकत्र येऊन जिल्हा पेठ पोलीस स्टेशन प्रशासनाच्या या वृत्तीच्या तसेच गावगुंडांचा निषेध नोंदवत आहोत महाविद्यालय प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने विद्यार्थी हित जोपासून काम बंद न ठेवता कर्मचाऱ्यांनी निषेध नोंदविला कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अत्याचारावर न्याय मिळण्यासाठी कर्मचाऱ्यांची शिष्टमंडळ तयार करून पुढील आठवड्यात दैनिक लोकमतचे श्री राजेंद्रजी दर्डा दैनिक दिव्य मराठीचे श्री संजयजी आवटे दैनिक सकाळचे श्री अभिजीत जी पवार दैनिक पुण्यनगरीचे श्री अरविंदजी शिंगोटे दैनिक देशदूत चे श्री विक्रमजी सारडा तसेच पोलीस महासंचालक यांना भेटून संपूर्ण कैफियत मांडून न्याय मिळविण्यासाठी साकडे घालणार आहोत तसेच या निषेध सभेत सर्व कर्मचाऱ्यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशन व गाव गुंडांच्या विरोधात दिनांक 29 जुलै 2019 रोजी जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचे ठरविले तसेच या मोर्चात विद्यार्थी त्यांचे पालक तसेच कर्मचारी यांच्या परिवारासहित हजारोच्या संख्येत भव्य मोर्चा काढण्याचा निर्धार या सभेत व्यक्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.