‘…त्यादिवशी मी भाजपात प्रवेश करणार’; गुलाम नबी आझाद

0

नवी दिल्ली : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्यसभा विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद नुकतेच राज्यसभेतून निवृत्त झाले. संसदीय अधिवेशनात  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुलाम नबी आझाद यांच्या आठवणींना उजाळा दिला. एका दहशतवादी घटनेचा संदर्भ देताना मोदी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. ‘तुमचा अनुभव आणि तुमच्या ज्ञानाचा देशाला लाभ दिल्यामुळे योगदानासाठी तुमचे मनापासून धन्यवाद करतो,’ असे गौरवाेद्गार मोदींनी निवृत्त होत असलेल्या खासदारांबाबत काढले होते.

‘मला चिंता आहे की गुलाम नबीजीनंतर जो कोणी हा पदभार स्वीकारेल त्याला गुलाम नबीजी यांच्यासारखं बनता येईल का? गुलाम नबी आझाद यांच्यानंतर त्यांच्या पदावर येणाऱ्या नेत्याला त्यांची उणीव भरून काढणे थोडे कठीण जाईल. कारण गुलाम नबी हे पक्षासोबतच देशहिताकडेही लक्ष द्यायचे’, असे म्हणत मोदींनी अजादांचे तोंडभरून कौतुक केले आहे. ‘पद, सत्ता जीवनात येत जात राहते. मात्र, ती कशी पचवावी हे आझाद यांच्याकडून शिकावे’, असे म्हणत मोदींनी सदनात त्यांना सलाम केला. यावेळी मोदी भावूक झाले होते.

दरम्यान मोदींच्या या भाषणानंतर आझादांच्या भाजप प्रवेश करण्यावर सोशल मीडियात राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र सर्व चर्चेवर खुद्द गुलाम नबी आझाद यांनी भाष्य करत त्यावर मौन सोडलं आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आझाद म्हणाले की, ज्या दिवशी काश्मीरमध्ये काळा बर्फ पडेल त्यादिवशी मी भाजपात प्रवेश करेन असं स्पष्ट केले आहे

या मुलाखतीत आझाद यांनी सांगितले की, ज्यादिवशी काश्मीरमध्ये काळा बर्फ पडेल त्यादिवशी मी भाजपात प्रवेश करेन, फक्त भाजपाच नाही तर अन्य कोणत्याही पक्षात प्रवेश करू शकतो, जे लोक अशाप्रकारे अफवा पसरवत आहेत त्यांना माझ्याबद्दल काही माहिती नाही. जेव्हा राजमाता शिंदे विरोधी पक्षाच्या उपनेत्या होत्या तेव्हा माझ्यावर आरोप केले होते. तेव्हा मी सांगितलं होतं अटलबिहारी वाजपेयी, शिंदे आणि एल के अडवाणी यांची कमिटी बनवून १५ दिवसांत रिपोर्ट द्यावा, कमिटी जी शिक्षा देईल ते मान्य असेल. त्यावेळी वाजपेयी सभागृहात म्हणाले होते, मी सभागृह आणि गुलाम नबी आझादांची माफी मागतो, कदाचित राजमाता शिंदे या त्यांना ओळखत नाही परंतु मी त्यांना ओळखतो असं आझाद यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.