तृतीयपंथीयाचा खून करणाऱ्यांनी गुराख्याला पैसे, दागिण्यांचे दाखविले आमिष … पण

0

बोदवड : दि. ७ रोजी येथील उजनी दर्गाच्या परिसररात नशिराबाद येथील चंदा नामक तृतीयपंथीचा खून झाला होता. तृतीयपंथी चंदाच्या हत्त्येनंतर आरोपींना पकडणाऱ्या गुराख्यांना त्यांनी पैसे, दागिण्यांचे आमिष दाखविले मात्र ते त्यांना नाकारत आरोपींना पोलिसांच्या ताब्यात दिल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून गुराख्यांचे कौतुक होत आहे.

चंदा नामक तृतीयपंथीचा प्रेम संबंध असलेल्या संशयित आरोपी संदीप साळुंखे व त्याच्या तीन मित्रांनी खून केला होता. वारंवार लग्नासाठी मानसिक त्रास दिल्याने या तृतीयपंथीयाला मारण्यात आले होते. या घटनेतील आरोपींना पकडून देण्यात पोलिसांना गुराख्यांची मदत झाली होती.

व्हिडिओ सोशल मीडियावर
घटनेचा तपास सुरू असताना १० रोजी एक व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल झाला असून यात चारही आरोपी तृतीयपंथी चंदा चा खून करून घटनास्थळा वरून पसार होत असताना, आजूबाजूला जंगलात गुरे, बकºया चारणाºया गुराख्यानी मोठी हिम्मत करत चारही आरोपींना चोप देत पकडले होते. त्या वेळेस गुराख्याकडे असलेल्या मोबाइलवर घटनेचे चित्रीकरणही करण्यात आले होते. गुराख्यांनी आरोपींना जाब विचारला असता आरोपींनी त्यांना आमच्या जवळ चांदीचे पाटले, सोन्याचे कडे, तसेच इतर दागिने आहेत ते तुम्हाला देतो पण आम्हाला सोडा व पैशाचे आमिषही दाखवले होते, परंतु गुराख्यानी पैसे नाकारत सदर घटनेच्या आरोपींना गजाआड केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झला आहे. यात सर्व स्पष्ट दिसत असल्याने गुराख्यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.