जळगाव ;- औद्योगिक वसाहतीतील तुलसी एक्सटूजन मधील कायम कामगारांना मागील सात ८ महिन्यापासून दरमहा वेतन मिळत नसल्यामुळे अन्न सुरक्षा अंतर्गत धान्य मिळावे या मागणीसाठी शनिवारी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले .
औधोगिक वसाहत तुलसी एक्सटूजनमधील कायम कामगार मागील ८ महिन्यापासून मासिक वेतनापासून वंचित ठेवले जात असल्यामुळे कामगारांच्या कुटुंबीयांची प्रचंड उपासमार होत आहे. व्यवस्थापन उद्दिष्टपूर्वक कामगारांना त्यांचा न्याय हक्कापासून वंचित ठेवत उपासमारीच्या खाईत लोटत आहेत . वरील पार्शवभूमीवर जळगाव वर्कर्स युनियन तर्फे तुलसी एक्सटूजन मधील कायम कामगारांना अन्न सुरक्षा अंतर्गत जगण्यासाठी धान्य पात्र लाभार्थी यादीत सर्व कामगारांना सामाविष्ट करून जगण्यासाठी उपासमारीचा प्रश्न सोडविण्यासाठी पात्र लाभार्थी गटात त्वरित सामाविस्ट करून २ रु किलो दराने धान्य मिळावे अशी मागणी कॉ प्रकाश कोळी ,विजय पवार ,सुनील सपकाळे ,डि. जे. पाटील , कैलास कोळी, धनराज कोळी, दीपक भिरूड, राजेश नारखेडे, संतोष बारसे यांनी केली आहे.