तुरुंगातील कैद्यांना सोडून द्या, सर्वोच्च न्यायालयाचे जेल प्रशासनाला सूचना

0

नवी दिल्ली । भारतात कोरोनाने चांगलेच हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस बाधितांचा आकडा वाढतच आहे. भारतात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला तर कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 396 वर पोहोचली आहे.दरम्यान, करोनाच्या वाढत्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर ७ वर्षापेक्षा कमी शिक्षा असलेल्या कैद्यांना पॅरोलवर सोडण्याच्या सूचना सुप्रीम कोर्टाने जेल प्रशासनाला दिल्या आहेत. तुरुंगातील गर्दी टाळण्यासाठी सुप्रीम कोर्टानं ह्या सूचना दिल्या आहेत.

जेल मधून काही कैदी बाहेर जात होते मात्र, त्यांची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरनिंग द्वारे होत होती. अशा परिस्थितीत एकही कैद्याला कोरोनाची लागण झाली तर इतरही कैद्यांना त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो अशी भीती जेल प्रशासनाकडून वर्तवली होती. त्यामुळं सुप्रीम कोर्टानं आता काही कैद्यांना अंतरिम जमीन देऊन सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. सुप्रीम कोर्टानं कैद्यांना सोडण्याच्या आदेशाची अंबलबजावणी करण्यासाठी एक समिती गठीत करण्याची सूचना केली आहे. ज्या कैद्यांची शिक्षा ७ वर्षापेक्षा कमी आहे तसेच ज्या कैद्यांचे छोट्या गुन्ह्यांचे खटले कोर्टात सुरु आहेत अशा सर्व कैद्यांना सोडण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. या सर्वांना ६ महिन्यांच्या पॅरोलवर सोडण्याचे कोर्टाच्या आदेशात म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.