Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!
    • ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप
    • जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
    • इंधन बचतीसाठी महापौरांकडून टू व्हीलर वापरायला सुरुवात!
    • जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी
    • कर्मचारी नाही, तुम्हीच येवून माहिती शोधा!
    • सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण!
    • आरोहण स्नेहसंमेलनाचा उत्साहात समारोप
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»तुम्ही देखील UPI द्वारे व्यवहार करताय तर मग ‘ही’ बातमी नक्की वाचा
    ताज्या बातम्या

    तुम्ही देखील UPI द्वारे व्यवहार करताय तर मग ‘ही’ बातमी नक्की वाचा

    By January 2, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : केंद्र सरकारने डिजिटल व्यवहारांवर जोर दिल्यापासून नागरिकांकडून युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात UPI द्वारे व्यवहार वाढले आहेत. अनेक खासगी बँकांनी UPI द्वारे व्यवहार करण्याची सुविधा सुरू केली आहे. पण, नव्या वर्षापासून UPI व्यवहारांवर शुल्क आकारले जाणार असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते. त्यावर आता नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने शुक्रवारी निवेदन जारी करुन स्पष्टीकरण दिले आहे.

     

    1 जानेवारी 2021 पासून UPI द्वारे केलेल्या व्यवहारांवर शुल्क आकारले जाणार नाही, असे NPCI ने स्पष्ट केलं आहे. चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका आणि सहजसोप्या पद्धतीने UPI व्यवहार सुरू ठेवा, असे आवाहनही NPCI कडून नागरिकांना करण्यात आलंय. त्यामुळे नव्या वर्षातही UPI वापरकर्त्यांना विनामूल्य सेवा वापरता येणार आहे.

     

    खासगी बँकांनी युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे, अशी बातमी समाज माध्यमांवर पसरली होती. नव्या वर्षापासून एका महिन्यात UPI द्वारे 20 पेक्षा अधिक व्यवहार केल्यास प्रत्येक व्यवहारावर 2.5 रुपये आणि 5 रुपये शुल्क द्यावे लागणार असल्याचे, या व्हायरल वृत्तात म्हटले होते. पण युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) व्यवहारांवर शुल्क आकारले जाणार असल्याचे वृत्त खोटं असल्याचे NPCI ने स्पष्ट केले आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!

    May 16, 2026

    ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप

    May 16, 2026

    जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

    May 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif