वरणगाव : येथील तीर्थक्षेत्र नागेश्वर महादेव मंदिराच्या विकासासाठी तत्कालीन मंत्री व जिल्हयाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पर्यटन विभागातून येथील तिर्थक्षेत्र नागेश्वर मंदिराच्या विकास कामासाठी दोन कोटी चौऱ्याहत्तर लक्ष रुपयाचा निधी मंजूर करून दिल्याने त्या कामाची सुरुवात मंदिराचे संस्थापक चंद्रकांत बढे यांचे हस्ते सुरुवात करण्यात आली.
शहरातील व परिसरा साठी एकमेव पर्यटन व सर्वात जुने तिर्थक्षेत्र नागेश्वर मदिराची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पावन हस्ते प्राचीनकाळी उभारणी केलेली होती. कालातराने ते जिर्ण अवस्थेत झाल्याने व त्या मंदिरा परिसरात समाजपोयी पर्याटन स्थळ होउून भावीकाची या मंदिरा परिसरात वर्दळ व्हावी या उद्देशान माजी नगराध्यक्ष सुनिल काळे यांनी पर्याटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे यासाठी निधी देण्याची मागणी केल्याने पर्याटन विभागातून दोन कोटी चौऱ्याहत्तर लाख रूपयाचा निधी मंजुर करण्यात आल्याने दि ३० मंगळवार रोजी तीर्थक्षेत्र नागेश्वर मंदिराच्या परिसराच्या विकास कामाची सुरुवात संस्थानचे अध्यक्ष चंद्रकांत हरी बढें यांच्या हस्ते नारळ वाढवून केली.
यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे संस्थेचे चे बी एम पाटील सर भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष संतोष माळी भाजपा शहराउपध्यक्ष हितेश चौधरी मिलिंद भैसे पप्पू ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीती होती यात एकूण दोन कोटी चौऱ्याहत्तर लक्ष निधीतुन सभा मंडप फेव्हर ब्लॉक शौचालय बगीचा पिण्याच्या पाण्याची वेवस्था तीर्थक्षेत्र नागेश्वर मंदिर ते विश्रामगृहापर्यतचा रस्त्याचे रुंदीकरण दुभाजक लाईट यंत्रणा कामाचा समावेश आहे. भरीव निधीतीतून तीर्थक्षेत्र क्षेत्र नागेश्वर महादेव मंदिर हे जिल्ह्यात नंबर एक च होणार आहे. शेगाव च्या धर्तीवर तीर्थक्षेत्र नागेश्वर चा सुद्धा एक दिवशी नावलौकिक होईल तसेच तीर्थक्षेत्रा चा विकास झाला पाहिजे यासाठी मी बऱ्याच वेळा राजकिय व सामाजक दात्याकडे या मंदिराच्या विकासा चर्चा करून निधी उपलब्ध होईल याची चार्चा केली मात्र निराशाच हाती येत होती मात्र सुनील काळे नगराध्यक्ष झाले आणि वरणगाव शहरात विकासाची गंगाच आणली असल्याचे मत बढे यांनी यावेळी व्यक्त केले.
तर काळे यांनी या विकास कामासाठी भाजपाचे सरकार असताना माजी पालकमंत्री गिरिष महाजन यांच्या कडे सतत पाठपुरवठा करीत तीर्थक्षेत्र नागेश्वर महादेव मंदिराच्या विकास कामासाठी मंजुर करुन घेतला यांचा मनस्वी आनंद असुन जिल्ह्यात नंबर एकच पर्यटन स्थाळ असेल या मंदिरास तीर्थक्षेत्र अ दर्जा मिळून देण्यासाठी खा रक्षा खडसे, आ संजय सावकारे यांच्या माध्यमातुन शासनाकडे प्रयत्न करणार असल्याचे सागीतले.

