तीन गावांमधील लाभार्थ्यांना घरकुले बांधण्यासाठी शासकीय जमीन मंजूर !

0

अहमदपूर (प्रतिनिधी) : दि. माळशिरस तालुक्यातील बाबुळगाव,गणेशगाव, व धानोरे या गावांमधील गरीब मराठा,धनगर,माळी, महार,मातंग या समाजातील 26 लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी शासकीय जागा उपलब्ध झाल्याचा शासकीय आदेश पारित झाला आहे.

नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे) संघटनेच्या वतीने माळशिरस शहराचे माजी सरपंच मा.विकास दादा धाइंजे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन केले होते.राज्य सचिव वैभवजी गिते यांनी माळशिरस तहसील कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर घरकुले बांधणार या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे.घरकुल लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी शासकीय जागा देण्याची महाराष्ट्रातील पहिलीच घटना आहे.

आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते मा. विकासदादा धाइंजे  व राष्ट्रीय दलित दलित न्याय आंदोलनाचे राज्य सचिव वैभव तानाजी गीते हे गोरगरिबांना हक्काचे घरकुल,घरकुलांना जागा व अतिक्रमणे नियमित करण्यासाठी पाठपुरावा करत आहेत त्यांच्या पाठपुराव्याला मिळालेलं हे पहिलं अभूतपूर्व व ऐतिहासिक यश आहे.सबंध तालुका जिल्हा व महाराष्ट्र ग्रामपंचायतिच्या निवडणुकांच्या निकालात व गुलाल उधळून घेण्यात दंग असताना विकास दादा व वैभव गिते या जोडीने मात्र सर्व जाती-धर्मांच्या गोरगरिबांच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देत गरिबांना हक्काचा निवारा मिळवून देण्याचा जो प्रामाणिक व यशस्वी प्रयत्न केला आहे त्यास तोड नाही….

 दैनिक लोकशाही चा दणका 

अतिक्रमणे नियमानुकूल करून घरकूलासाठी शासकीय जागा देण्यासाठी माळशिरस तहसिल कार्यालयासमोर तीव्र निदर्शनाची व घरकुले बांधायला शासकीय जागा दिली नाही तर तहसील कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर घरकुले बांधणार म्हणून दैनिक लोकशाही ने 19 जानेवारीला वृत्त प्रकाशित केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.