बोदवड (प्रतिनिधी) :- येथील ति.र.बरडिया मराठी शाळेत मराठी भाषा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी मराठी वेशभूषा म्हणजे,काष्टी पातळ,मुलांनी फेटा कुर्ता अश्या प्रकारची वेश भूषा परिधान केली होती.शाळेतील उपशिक्षक संदीप पारधी यांनी आपल्या वर्गात विविध उपक्रम साजरे केले.
यात विद्यार्थ्यांनी भाषणं दिली, तसेच मराठी गीतांचे गायन केले त्यात पोवाडे म्हटले,मराठी पुस्तकाचे वाचन मुलांनी यावेळी केले.
यावेळी शाळेच्या उपशिक्षिका सविता वंजारी यांनी विद्यार्थ्यांना मराठी दिना विषयी मार्गदर्शन केले.तर कार्यक्रमाचे आयोजक श्री.पारधी यांनी वि.वा.शिरवाडकर यांच्या विषयी विद्यार्थ्यांना सखोल माहिती सांगितली,त्याचंबरोबर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.कठोके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मराठी भाषेचे महत्व पटवून दिले.