तिहेरी अपघातात तीन जण जखमी

0

जळगाव :- मानराज जवळ झालेल्या तिहेरी अपघातात तीन जण जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री ९.३० ते ९.४५ वाजेदरम्यान घडली. या अपघातामुळे महामार्गावर माेठ्याप्रमाणात गर्दी झाली होती.

हा अपघात कार (क्र. एमएच १९, एपी ०२८३), रिक्षा (क्र. एमएच १९, व्ही- ९६०८) व माेटारसायकल (क्र. एमएच- १९, २३२५) या तीन वाहनांमध्ये झाला. या अपघातात रिक्षाचालक किशाेर सुरेश सपकाळे (वय २१, रा. संत मीराबाईनगर), रिक्षातील प्रवासी मनाेज गाेविंद पाटील (वय ३०, रा. सुरत) तर माेटारसायकल चालक रवी तुक्कड (वय ३८, रा. अारएल काॅलनी) हे जखमी झाले. अपघातानंतर लगेचच रिक्षातील जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अाणण्यात अाले. तर माेटारसायकल चालक रवी तुक्कड यांना एका खासगी रुग्णालयात हलवले. त्यांची प्रकृती गंभीर आहे.

या अपघातामुळे महामार्गावर माेठ्याप्रमाणात गर्दी झाली हाेती. माेटारसायकल चालक रवी तुक्कड हे जैन कंपनीत कामाला अाहेत. काम संपल्यानंतर ते माेटारसायकलने अापल्या अारएल काॅलनीतील घरी जात परत येत हाेते. याच दरम्यान मानराजजवळ कारने रिक्षाला धडक दिल्याने पुढे चालणाऱ्या माेटारसायकललादेखील याची धडक बसल्याने यात ते देखील जखमी झाले हाेते. या तिहेरी अपघातामुळे महामार्गावर व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात माेठ्याप्रमाणावर नातेवाइकांची गर्दी झाली हाेती.

Leave A Reply

Your email address will not be published.