खामगाव :- ४५० कि.मी पायी प्रवास खामगाव तालुक्यातील सारोळा येथील मजुरी कुटुंब नाशिक जवळिल घुटी येथे मजुरी करण्यासाठी गेलेल्या बुलढाणा जिल्हातिल एका कुटुंबाचा प्रवास ६ वर्षाच्या बालकापासुन ते ७२ वर्षिय वृध्दाचा चित्तथरारक प्रवास. दररोज रात्रंदिवस 55 कि.मी. चालने थक्क करणारा ठरला. या कुटुंबियातिय कुटुंब प्रमुख देवराव आनंदा जाधव वय ७२ वर्ष सर्वात मोठे असुन सोहम राजू जाधव वय ६ वर्षांचा मुलगा सर्वात लहान आहे. मैनाबाई देवराव जाधव वय ६५ , राजू देवराव जाधव वय ३१ विनोद देवराव जाधव वय २५, उषा राजू जाधव वय २८, पुनम राजू जाधव वय ११, ओम राजू जाधव वय ८, सोहम राजू जाधव वय ६, एकाच कुटुंबातील हे आठजण १ एप्रिल २०२० रोजी नाशिक जिल्हातिल घुटी येथुन पायी निघाले व ८ तारखेला सकाळी ११ वाजता रोहणा प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहचले. सर्वांची वैद्यकिय तपासणी केली या साठी सरपंचा ईंदुताई संजय ठोंबरे यांचे पती संजय ठोंबरे यांनी मदत केली. सर्वांची वैद्यकिय तपासणी केली असता सर्व जण ठणठणीत आहेत. तपासणी नंतर त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारण्यात आले असुन खामगाव तालुक्यातील कोंटी गट ग्रा. पंचायत अंतर्गत येणार्या सारोळा या गावचे हे कुटुंब घरातच क्वारंटाईन झाले आहे. ते स्वत:हुन दवाखान्यात तपासणीसाठी गेले होते हे विशेष. त्या कुटुंबाला सरपंच पती संजय ठोंबरे यांनी गहू व किराणा घेऊन दिला. प्रवासादरम्यान त्यांना कोणत्याही प्रकारचा पोलीसांचा म्हणा किंवा प्रशासनाचा त्रास झाला नाही. पोलीसांनी व प्रशासनाने वेळोवेळी भोजण पाण्याची व्यवस्था केली.
डोक्यावर ओझे पुर्ण संसार भांडीकुंडी. सर्व संसार डोक्यावर घेऊन सारोळा येथे आले.
तिकडे मरण्यापेक्षा आपल्या घराकडे जाऊन मरू असा विचार करुन ४५० कि.मी अंतर पायी पार केलेले खामगाव तालुक्यातील सारोळा येथिल जाधव कुटुंबाची साप्ताहिक समाजनिष्ठाने घेतलेली मुलाखत. साप्ताहिक समाजनिष्ठा चे संपादक बळिराम वानखडे. कोंटी सारोळा सरपंच पती संजय ठोंबरे यांचीही उपस्थिती होती.