तालुक्यातील होळ येथे प्रवाशी निवारा शेडची मागणी

0

पाचोरा (प्रतिनिधी) : नगरदेवळा ता. पाचोरा येथून जवळच असलेल्या होळ फाटा येथे प्रवाशी निवारा शेड नव्याने उभारण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

नगरदेवळा स्टेशन पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या होळ येथे प्रवाशी निवारा कै. माजी आमदार आर. ओ. पाटील यांच्या आमदार निधीतून बांधण्यात आला होता. परंतु आता मागील दोन वर्षात या राज्य महामार्गाच्या विस्तारीकरणामुळे सदर प्रवाशी निवारा सात ते आठ फूट रस्त्यापासून खाली गेला असून त्याची दुरावस्था झालेली आहे.

आजमितीला या रस्त्याला लागून नवीन प्रवाशी निवारा व्हावा व तेथे हॅलोजन लाईट ची व्यवस्था व्हावी जेणेकरून येथील ग्रामस्थ व प्रवाशी बांधवाना पावसाळ्यात व उन्हाळ्यात अडचण येणार नाही अशी आग्रही मागणी येथील ग्रामस्थांनी विद्यमान आमदार किशोर पाटील यांच्याकडे केली आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.