तालुक्यातील बोदर्डे ग्रामपंचायत सरपंच पदी राष्ट्रवादीचे प्रवीण संदानशिव

0

अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील बोदर्डे ग्रामपंचायत सरपंचपदी राष्ट्रवादीचे प्रवीण सुपडू संदानशिव सरपंचपदी तर उपसरपंचपदी नितीन डिगंबर पाटील, यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

 

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पवार हे ग्रामसेवक  ईश्वर पाटील तलाठी प्रदीप भदाणे उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित सदस्य आशाबाई शामराव भिल, ईश्वर श्रावण भिल, सुनंदा अंकुश पारधी, आदी सदस्य उपस्थित होते.

 

विजयी सरपंच उपसरपंचांचा राष्ट्रवादी चे जिल्हा उपाध्यक्ष गौरव पाटील, प्रणव पाटील, लोण सिम माजी सरपंच अंकिता पाटील,  केतन पाटील, तुषार पाटील, विकास पाटील, नाना भिल, शामा भिल, बापू भिल,  दीपक पाटील, गजू महाराज, अरुण भोमा पाटील अशोक पाटील, ज्ञानेश्वर पाटील, संजय पाटील, गणेश कुंभार, तुषार सैंदाने, तर चार सदस्य  गैरहजर होते. यावेळी नवनिर्वाचित सदस्यांचा गौरव करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.