चोपडा – शासनाचे धोरण नुसार २०१९-२० या शैक्षणिक वर्षाच्या आरटीइ २५ टक्के प्रवेश प्रक्रिया अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविन्यात आले होते, ज्यांच्या कागद मधे काही त्रुटि असेल यासाठी शासनाने एक तालुका स्तरीय पडताळनी समिति स्थापन केली होती. या समितिचे अध्यक्ष तालुका गट शिक्षणाधिकारी डॉ भावना भोसले या असून त्या संदर्भात १५ रोजी चोपडा गट शिक्षणाधिकारी डॉ भावना भोसले याच्या अध्यक्षते खाली तालुका पडताळनी समिति ची बैठक सम्पन्न झाली. या बैठकीत कागद पत्राची पडताळनी केल्यानंतर काही प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत.
तालुका पडताळनी समिति च्या बैठका 15 एप्रिल ते २६ एप्रिल पर्यत चालणार आहेत. सदर च्या बैठकीला गट शिक्षणाधिकारी डॉ भावना भोसले ,समिति चे सचिव एस जी गजरे , व समिति चे सदस्य मछिंद्रनाथ पाटिल ,माधुरी मयूर , अविनाश राणे, शरद पाटिल ,नरेंद्र सोनवणे ,राज मोहम्मद शिकलगर, अशोक साळूखे ,प्रशांत सोनवणे, नीता पाटिल, उमेश महाजन,संजय गुरव, राजेन्द्र पाटिल ,प्रदीप चौधरी, अनिता महाजन, सुरेखा चौधरी, युवराज पाटिल ,सदस्य उपस्थित होते.