जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
तारीक शेख यांनी लिहिलेल्या “इंडिया ईन टॉलरन्स” या पुस्तकाबद्दल जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी लेखनाविषयी आपला अनुभव अधिकृत पत्राद्वारे व्यक्त केला आहे.
तसेच जिल्हाधिकारी राऊत यांनी भावना अधिकृतपणे व्यक्त करताना समाज माध्यमांचा व इंटरनेटच्या या धावपळीच्या युगात जगाकडे उघड्या डोळ्यांनी पाहून, निरीक्षणाने चालू असलेल्या घटना टिपणे, त्या शब्दबद्ध करणे व तटस्थ दृष्टिकोनातून त्या अनुभवांचे पुस्तक प्रसिद्ध केल्याबद्दल अभिनंदन व्यक्त केले.
आपले मनोगत व्यक्त करताना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत म्हणाले की, या पुस्तकाचे भाषांतर मराठी व हिंदी भाषेत झाले पाहिजे, ज्यामुळे पुस्तकांमध्ये दिलेला आत्मीयता व सहिष्णुतेचा संदेश समाजाचे प्रत्येक घटकापर्यंत पोहचेल.