‘तारक मेहता’मध्ये नव्या अंजलीची एण्ट्री; ही अभिनेत्री साकारणार भूमिका

0

मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या विनोदी मालिकेतून गेल्या दोन वर्षांपासून अभिनेत्री दिशा वकानी बाहेर आहे. दिशाच्या कमबॅकची चाहते आतुरतेने वाट पाहात असतानाच आता या मालिकेला आणखी एका अभिनेत्रीने रामराम ठोकला आहे. या मालिकेत अंजली भाभीची महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा मेहताने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. १२ वर्षांपासून या मालिकेचा महत्त्वाचा भाग असलेल्या नेहाने आपला राजीनामा दिला आहे. त्यामुळे अंजली भाभीच्या जागी आता प्रसिद्ध अभिनेत्री सुनैना फौजदार अभिनय करताना दिसणार आहे.

अलिकडे रोशन सिंह सोधी ही व्यक्तिरेखा साकारणाारा गुरुचरण सिंह मालिकेतून बाहेर पडला. त्यानंतर आता अंजली भाभीच्या भूमिकेत झळकणा-या नेहा मेहता हिने देखील मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. नेहा मेहता गेल्या 12 वर्षांपासून अंजली भाभीची भूमिका साकारत होती. मात्र अचानक तिने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला.

ई टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार तारक मेहताची पत्नी अंजली मेहता या भूमिकेसाठी निर्मात्यांनी सुनैना फौजदार हिची निवड केली आहे. सुनैना येत्या काही काळात मालिकेत अभिनय करताना दिसेल. मात्र तिची या मालिकेत एण्ट्री कशी होणार? याबाबत निर्मात्यांनी अद्याप काहीही स्पष्ट केलेलं नाही. नेहा मेहता गेल्या १२ वर्षांपासून तारक मेहतामध्ये काम करत आहे. मात्र सातत्याने एकच व्यक्तिरेखा साकारुन आता कंटाळली असल्यामुळे तिने मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असं म्हटलं जात आहे. मात्र नेहाने याबाबत कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.