तिरुचिरापल्ली :- तामिळनाडूमधील तुरायूरमध्ये एका मंदिरात रविवारी आयोजित एका कार्यक्रमामध्ये चेंगराचेंगरी झाल्याने सात भाविकांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले.
चैत्र पौर्णिमेनिमित्त दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. जेव्हा पुजाऱ्यांनी मंदिराच्या शिक्क्यांचे वितरण सुरु केले तेव्हे तो मिळविण्य़ासाठी भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. मुथियमपलयम गावातील रूप्पास्वामी मंदिरात मंदिराचा शिक्क्याचे वितरण करण्यात येत होते. यावेळा चार महिलांसह सात जणांचा मृत्यू झाला. तर अन्य 10 जण जखमी झाले आहेत.
मंदिराच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की पूजा सुरु असताना गर्दीला नियंत्रित करण्यासाठी कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाहीत. तसेच गर्दीच्या प्रमाणात तेवढे पोलिसही मंदिरात उपस्थित नव्हते.