तामसवाडी येथे शेत रस्त्यावरून हाणामारी दोन जखमी,सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

0

पारोळा –  तालुक्यातील तामसवाडी येथे शेतीचे शेत रस्त्यावरून गेल्याचे वाईट वाटून दोन जणांना काठीने व सळईने बेदम मारहाण केल्याची घटना दिनांक 1 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता तामसवाडी शिवारात घडली.

याबाबत फिर्यादी प्रवीण बापू पाटील रा. तामसवाडी हे व त्यांचे मावसा पांडुरंग हिरामण पाटील हे ट्रॅक्टरवर गहू पेरण्यासाठी त्यांच्या शेतात जात असताना आजूबाजूचे शेतकरी नवल उर्फ गोल्या माणिक पाटील, अनिल माणिक पाटील, माणिक भास्कर पाटील, विद्याबाई माणिक पाटील, सर्व राहणार तामसवाडी बापू नाना पाटील राहणार भिलाली, गोपाळ दिनकर पाटील राहणार सिंदी हल्ली मुक्काम तामसवाडी यांनी दिनांक 1 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता फिर्यादी व साक्षीदार हे ट्रॅक्टरने त्यांच्या शेतात गहू पेरणीसाठी जात असतांना शेताच्या वहिवाट रस्त्यावर का ट्रॅक्टर चालवत आहे असे बोलत वाद घालत गैरकायद्याची मंडळी जमवून दोघांना वरील सहा जणांनी लाकडी काठीने व लोखंडी सळईने हातावर डोक्यावर मारून गंभीर दुखापत केली व शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद आज दि.३ फेब्रुवारी रोजी प्रवीण पाटील यांनी पारोळा पोलिसात  दिली यावरून वरील संशयित आरोपी विरुद्ध भाग 5 गुरंन  16/20 आयपीसी कलम 325, 324, 323, 143, 147, 148, 149, 504, 506 प्रमाणे मारहाण व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.