चोपडा(प्रतिनिधी) : तापी नदी ही खानदेशातुन वाहत जाणारी मुख्य नदी अाहे. तिला सूर्यकन्या असेही संबोधिले आहे.तापीचा उगम म.प्र मधील बैतुलच्या मुलताई जवळचा असून गुजराथ मधील सुरत जवळ अरबी समुद्रात संगम होतो. जळगांव जिल्ह्यात तापी नदीवर हतनूर धरण आहे.हे धरण बांधण्याच्या आधीच्या काळात तापीनदी बारमाही व चोविस तास वाहत होती. परंतु सध्याच्या धरण व्यवस्थेमुळे या नदीचा प्रवाह पावसाळ्यानंतर खंडित करण्यात येत असतो. नदीच्या काठांवरील गावांची तहान भागविणारी तापी नदी ही त्या त्या गावांची संपत्तीही आहे.
सुरुवातीच्या काळात अर्धा गाव कामधंद्यानिमित्त नदीत व नदीच्या काठी असायचा. माणसांची, गुराढोरांची व शेतीपिकांसाठी लागणार्या पाण्याची व्यवस्था याच नदीतून होत असे.आज जागोजागी पाण्याची उपलब्धता जरी झालेली असली तरी तापी नदीत बारमाही चोविसतास पाण्याची धार(प्रवाह)अखंड वाहत राहिली पाहिजे, अशी आग्रही मागणी चोपडा मार्केट कमिटीचे माजी संचालक जगन्नाथ टि.बाविस्कर यांनी ह्या पत्रकान्वये केली आहे.
वाहत्या नद्या ह्या मानवी जीवन उपजीविकेचे प्रमुख साधनसंपत्ती आहेत.पावसाळा संपला की धरणांचे दरवाजे बंद करण्यात येतात. तसा नद्यांतील पाण्याचा प्रवाह खंडित होत असतो. पर्यायाने जमिनीतील पाण्याची पातळी खोल जाऊन सध्याच्या विहिरी व कूपनलिका कोरड्या पडतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे खूपच नुकसान होत असते. या परिसराला पाण्याचे दुर्भिक्ष होऊन पाणी टंचाई होत असते.यासाठी हतनुर धरणातून तापीनदीत अखंड पाणी वाहत राहील एवढा प्रवाह सोडत राहिला पाहिजे.आजमितीस नद्यांमध्ये पावसाळ्याप्रमाणे पाणी सोडून नद्या दुथडी वाहताना दिसत आहेत.
यामुळे पाण्याचा अपव्यव होत असतो.व दोन दिवसात नदी पुन्हा कोरडी होत असते.हेच पाणी जर कायम थोडेथोडे सोडत राहिले तर नदीचा प्रवाह खंडीत न होता नदीचे पात्र कोरडे होणार नाही.असे केल्याने पाण्याची टंचाई भासणार नाही,यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी,आजी-माजी मंत्री महोदय,आमदार,खासदार, स्थानिक लोकप्रतिनिधी, राजकीय व सामाजिक संस्था संघटनांचे पदाधिकारी,व कार्यकर्ते,समाजसेवक,तापीकाठावरील गावांचे सरपंच यांनी तसे पत्र,ठराव पाठवुन याबाबत हतनूर धरणातून तापी नदीत पाण्याचा प्रवाह कायम वाहत राहिला पाहिजे, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.असेही आवाहन गोरगांवलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांनी केले आहे.