भुसावळ (प्रतिनिधी)- इनरव्हील क्लब भुसावळ व सक्षम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भुसावळ व परीसरातील मुली व महिलांसाठी हेल्पलाइन सुरू होत असून गुरुवार रोजी उद्घाटन संपन्न झाले.
कोवीडच्या कठिण काळात, व एरव्ही सुध्दा दैनंदिन कार्यक्रमात महिलांना अनेकवेळा भावनिक व मानसिक ताण येत असतो यामुळे मनातील भावनांचा कोंडमार झाल्याने मानसिक व नंतर शारीरिक समस्या उद्भवू शकतात. त्यावर उपाय म्हणून ही हेल्पलाइन सुरु करून तज्ञांचे मार्गदर्शन मिळणार असल्याचे सक्षम कौन्सिलींग सेंटरच्या सौ. आरती चौधरी यांनी सांगितले. इनरव्हीलच्या अध्यक्षा सौ. शीतल भराडे यांनी सांगितले की इनरव्हील नेहमीच महिला व मुलांसाठी कार्य करण्यात अग्रेसर आहे. व ह्या हेल्प लाईन चा फायदा महिलांना व पर्यायाने समाजाला नक्कीच होईल. सुरवातीला हे कौन्सिलींग फ्री असेल व याबाबतच्या गुप्ततेचे पालन अत्यंत काटेकोरपणे होइल. जर इच्छा नसेल तर नाव न सांगता ही महीलांना व मुलींना याचा लाभ घेता येईल असे त्यांनी सांगितले. इनरव्हील डिस्ट्रिक्ट ३०३ मधे प्रथम हेल्प लाईन सुरू करण्याचा मान इनरव्हील क्लब ऑफ भुसावळला मिळाला आहे. असे ही सौ. शीतल भराडे यांनी सांगितले. दि. २७-८-२०२० पासून ही हेल्पलाइन सुरू होईल असे सांगितले आहे.
यासाठी डॉ. संगीता चांडक, डाॅ. मधू मानवतकर, वंदिता पारे या कमीटीत असल्याचे सौ. शीतल भराडे यांनी कळविले आहे. या हेल्पलाईनच्या उद्घाटनप्रसंगी इनरव्हील अध्यक्षा शीतल भराडे, असो. सीसीसीसी डॉ रश्मी शर्मा, सेक्रेटरी रूचिका शर्मा, आरती चौधरी डॉ संगीता चांडक सविता शुक्ला व कांचन जोशी हजर होत्या.