डॉ. चंद्रकांत साळुंखे यांचे प्रतिपादन : 10 व्यक्तींना ज्ञानरत्न पुरस्कार 2019 प्रदान
भुसावळ :- सध्याच्या धावपळीच्या युगात सर्वांना ताणतणावाला सामोरे जावे लागत आहे. या ताणापासून सुटका हवी असेल तर ज्ञान आणि मनोरंजनाशिवाय पर्याय नाही. ताणाची मुळापासून सुटका करून घेण्यासाठी ज्ञान आणि तणावातून बाहेर पडण्यासाठी मनोरंजन हवे. हे करण्यासाठी समूहात राहून विचारांची देवाणघेवाण करायला हवी, असे प्रतिपादन जेष्ठ अधिव्याख्याता डॉ. चंद्रकांत साळुंखे यांनी येथे केले.
भुसावळ येथील नाहाटा महाविद्यालयात आयोजित ज्ञानरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात ते अध्यक्षीय मनोगतात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माध्यमिक शिक्षण सभापती सौ. मंगला आवटे, प्राथमिक शिक्षण सभापती ऍड. तुषार पाटील, भुसावळ विभागाचे डाक अधिक्षक पी.बी. सेलूकर, प्राचार्य डॉ. अनिल झोपे, गृपप्रमुख डॉ. जगदीश पाटील यांची उपस्थिती होती. प्रारंभी सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. अतिथींचा परिचय सौ. दिपाली पाटील यांनी केला. प्रास्ताविकात गृपप्रमुख डॉ. जगदीश पाटील यांनी गृपच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून गृपतर्ङ्गे आतापर्यंत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. अमितकुमार पाटील, दिलीप ढाके, जीवन महाजन, प्रा.उमाकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. पुरस्कारार्थींचा परिचय सौ. हेमांगिनी चौधरी व सौ. निलाक्षी महाजन यांनी तर विशेष सत्कारार्थींचा परिचय सौ. प्राजक्ता बोठे यांनी करून दिला. पुरस्कारार्थी मनोगत रोहिदास सोनवणे यांनी तर विशेष पुरस्कारार्थी मनोगत प्रमोद आठवले व प्रा.दिलीप ललवाणी यांनी व्यक्त केले. प्रमुख पाहुणे सौ. मंगला आवटे यांनी मानवी जीवनातील शिक्षणाचे महत्व पटवून दिले. ऍड. तुषार पाटील यांनी शैक्षणिक व सामाजिक चळवळ म्हणजे समाज परिवर्तनाची नांदी असल्याचे सांगितले. पी.बी. सेलूकर यांनी समूहाचे महत्व विशद करून डाक विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. अध्यक्षीय मनोगत डॉ. चंद्रकांत साळुंखे यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन सौ. मनिषा ताडेकर यांनी तर आभार सौ. नयना ढाके यांनी मानले. यशस्वीतेसाठी ज्ञानासह मनोरंजन गृपच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
दहा व्यक्तींना ज्ञानरत्न पुरस्कार – ज्ञानासह मनोरंजन गृपतर्ङ्गे दहा व्यक्तींना उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल स्मृतिचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ व मोत्यांची माळ देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यात मुख्याध्यापक अरूण धनपाल, मुख्याध्यापक सुनिल भिरूड, डॉ. खेमचंद्र बोरोले, रोहिदास सोनवणे, दिनेश देवरे, दंगल पाटील, प्रा. समाधान पाटील, शैलेंद्र वासकर, कैलास तांबट व प्रशांत ढाके यांचा समावेश होता. तसेच विशेष सत्कारार्थी म्हणून दिलीप वैद्य, सुनिल वानखेडे, बी.बी. जोगी, प्रा.दिलीप ललवाणी, शामकांत रूले, प्रमोद आठवले, डॉ. शुभांगी राठी, राजेंद्र जावळे यांचा सन्मान करण्यात आला.