निपाणे, ता.एरंडोल (वार्ताहर) : येथून जवळच असलेल्या ताडे येथील शेतकरी रविंद्र गोविंदा धनगर यांच्या मालकीचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर एम एच १९ cu ६०७९ या नंबरचे ट्रॅक्टर घराजवळून दि, २४सप्टेंबर च्या रात्री कुणीतरी अज्ञात चोरट्याने रोटासह चोरुन नेले आहे. ट्रॅक्टर मालक रविंद्र गोविंदा धनगर यांनी संपूर्ण जळगाव जिल्हा पिंजून काढला परंतु ट्रॅक्टर मिळून आले नाही. त्यामुळे त्यांनी कासोदा पोलिसांत ट्रॅक्टर हरवल्याची नोंद केली आहे स्वराज कंपनीचे वरील नंबर असलेले निळा कलरचे ट्रॅक्टर कुणाला आढळून आल्यास मो, नं, ९१५८४६८४५७ यावर संपर्क करावा असे आवाहन ताडे येथील शेतकरी रविंद्र गोविंदा धनगर यांनी कळविले आहे.