चाळीसगाव :- तालुक्यातील तांबोळे येथील शहीद वीर जवान अरुण जाधव यांच्या शहीद दिनानिमित्त रविवारी संध्याकाळी खानदेश रक्षक ग्रुप तर्फे गावातून जाधव यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मराठी शाळा जवळील शहीद वीर जवान अरुण जाधव यांच्या पुतळ्याजवळ मिरवणूकीची सांगता करुन सैन्यातून सुटीवर आलेले जवान खानदेश रक्षक ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष सचिन पाटील, सचिव समाधान सूर्यवंशी,प्रविण पाटील,प्रविण महाजन,सोरनसिंग परदेशी, समाधान महाजन,जालींधर चित्ते, अभिमन्यू जाधव,प्रशांत चव्हाण, विनोद मांडोळे, शरद पाटील, राहुल रावते, मनोहर महाले या जवानांनी शहीद वीर जवान अरुण जाधव यांच्या पुतळ्याजवळ सैनिकी मानवंदना देवून पुष्पचक्र अर्पण करण्यात आली.यावेळी मानवंदनेस चाळीसगाव तालुका व्रुत्तपत्रकार मित्र मंडळाचे अध्यक्ष आर डी चौधरी,तांबोळे ग्रामपंचायत सरपंच डिगाबंर कुमावत,यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जाधव यांच्या कूटूबासह हिरापूर,गणेशपूर,खडकी पिंपरी या परीसरातील जनते सह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.