खाजगी कंपनीच्या टाँवरची मागणी
जामनेर :- तालुक्यातील तळेगावसह परिसरात भारत संचार निगम लिमिटेडची इंटरनेट सेवा वारंवार ठप्प होत असल्याने ग्राहक हैराण झाले असून या परिसरात एखाद्या खाजगी कंपनीने आपले टावर उभारावे अशी मागणी केली जात आहे.भारत संचार निगम लिमिटेडची केबल या महिन्याभरात चौथ्यांदा तुटल्यामुळे पंचवीस गावाची सेवा सेवा ठप्प झाल्यामुळे ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.अजूनही इंटरनेट सेवा सुरू न झाल्याने तळेगाव परिसरात इंटरनेट सेवा विस्कळीत असल्याने व्यापारी वर्गासह सर्वसामान्य ग्राहकांना मनस्ताप मुकाटयाने सहन करावा लागत आहे.
तळेगावसह परिसरातील शासकिय कार्यालये,ग्रामपंचायत, तलाटी,बँक ,ग्राहक सेवा केंद्र व्यापारी इंटरनेट सेवेने जोडलेली आहेत.तसेच सध्या सर्वत्र आँनलाईन व्यवहाराना चालना मिळाल्याने इंटरनेटचा वापरही वाढला आहे.मात्र महाराष्ट्रभर ग्रामपंचायतीना आ़ँनलाईन नविन केबलच्या कामादम्यान रमफक्टरी जवळ पुन्हा चौथ्यादा केबल तुटकल्याने अर्धा तालुक्याची सेवा बंद झाली आहे मात्र तळेगाव परिसरात दुसरी कोणतीही सेवा नसल्यामुळे अत्यावश्यक सेवे साठी रूग्णालयात जाण्यासाठी रूग्णवाहिकेला सुध्दा संपर्क करता येत नाही.यामुळे कोणत्याही अनर्थ घडू नये यासाठी परिसरातुन खाजगी इतर इंटरनेट सेवेची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे.तळेगाव, शेळगावसह नऊ ते दहा हजार लोक वस्तीतील गावामध्ये आधुनिक युगात भारत संचार निगम लिमिटेडचेच केबल तुटन्याच्या कारणे किंवा विजपुरवठा खंडित झाल्याने वारंवार इंटरनेट सेवा खंडित होत असल्याने परिसरातील लोकाना नाहक ञास सहन करावा लागत आहे.
खाजगी कंपनीच्या टाँवरचची मागणी
यामुळे बीएसएनएल मोबाईल नेटवर्क देखील बंद आहे.हे नेहमीचेच असल्यामुळे दुरध्वनीधारकांनी दुसऱ्या खाजगी कंपनीच्या इंटरनेट सेवेची ( टाँवरची ) मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे.दहा हजार लोक वस्तीत एकच बिएसएनएल सेवा असल्याने ग्राहक खाजगी कंपनीच्या इंटरनेट सेवेची मागणी मोठ्या प्रमाणात करित आहे. जिओ,कंपनीचे सुध्दा ग्राहक मोठ्या प्रमाणात आहे पण तेही इंटरनेट सेवा पुरेशी नसल्याने वेढयासारखे मोबाईल गावाबाहेर जाऊन हात उंच करुन नसल्यासारखे नेट वापरावे लागत आहे तीच गत आय.डी.आय, वोडाफोन कंपनीचे सुध्दा तसेच आहे.त्यामुळे खाजगी कंपन्यांच्या टाँवरची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे.
हा नित्याचाच प्रकार
शासनाने सर्व शासकिय कार्यालयांमध्ये बीएसएनएलच्या माध्यमातून इंटरनेट सेवा उपलब्ध केली आहे मात्र सेवेत सातत्याने बिघाड होत असल्याने सर्व कामे करण्यासाठी नागरिकांना नहाक ञास सहन करावा लांगत आहे.
अधिकारी नाँट रिचेबल
बीएसएनएल सेवेत बिघाड होणे ही नित्याचीच बाब झाली आहे. त्यामुळे शासकिय कार्यालयासह खाजगी व्यवसायीकावर परिणाम होत आहे असून संबंधित अधिकारी फोन उचलत नाही किंवा नाँट रिचेबल असल्याने ग्राहकांना नहाक ञास सहन करावा लागत आहे.